Annual Events-2013
! श्री विंझाई मातायै नमः !!
श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी
श्रींचा वार्षिकोत्सव २०१३
प्रिय भक्तजन, श्रींचा वार्षिकोत्सव २५ एप्रिल २०१३ व २६ एप्रिल २०१३ रोजी साजरा होत आहे.
काही खास बाबी
१. कै. महादेव अनंत प्रधान (रास्ता पेठ, पुणे) यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांकडून दि. २५.४.१३ च्या सकाळच्या महाप्रसादासाठी रु. ३५०००/-देणगी प्राप्त. मंडळ त्यांचे आभार मानत आहे.
२. श्रींच्या वार्षिक उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी चहा, नाश्ता व जेवण यांचा आकार पुढीलप्रमाणे:-
दिनांक २४.४.१३ रोजी रात्रीच्या श्री नवचंडी होमाच्या प्रसादाचे भोजन रु. ७५/-.
• चहा/कॉफी रु. ५/-. • नाश्ता – रु. १५/-
• दुपारचे भोजन – रु.७५/- • रात्रीचे भोजन – ६०/- • चौथ्या दिवसाचे भोजन – रु. ६०/-.
३.ओटी कुपन्स दि.२४.४.१३ रोजी संध्याकाळपासून देण्यात येतील. क्रमवार पद्धतीनेच ओटी भरली जाईल.
४.ओटी प्रित्यर्थ साडी वाहणारया सुवासिनींनी साडी खरेदीची पावती बरोबर आणावी.
५.श्री विंझाई मातेस वस्तू रूपाने वाहण्याकरिता आणलेल्या वस्तुंची पावती सोबत आणणे जरुरी आहे.
६. सर्व भक्तांस विनंती कि, आपला सभासद क्र. पत्ता, फोन नं, मोबाईल नं व ईमेल आय् डी.मंडळास
अवश्य कळवावा.७.आपली देणगी शक्यतो धनादेशाद्वारे - श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी या नावाने द्यावी.
८. उत्सव काळात भक्तजन तसेच ताम्हिणी ग्रामस्थांचे बहुमुल्य सहकार्य लाभते त्यांचे मंडळ मनःपूर्वक आभारी
आहे.
Email:shrivinzaitamhini1973@gmail.com
website: www.vinzai.org
facebook:श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी