History - श्री देवींचा इतिहास
श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी:- भारतात आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. जागृत कुलस्वामिनी श्री विंझाई मातेचे मंदिर,सह्याद्री पर्वतराजीमध्ये ताम्हिणी घाटाच्या कुशीत निसर्गरम्य ताम्हिणी या चिमुकल्या व शांत गावात आहे. श्री विंझाई माता हे महाराष्ट्रातील इतर साडेतीन शक्तीपिठासारखेच जागृत देवस्थान आहे. श्री विंझाई देवस्थान मंडळाची स्थापना १८ एप्रिल १९७३ रोजी झाली. मंडळाने शिवमंदिर व भक्त निवास विस्तार योजना या प्रकल्पाचा संकल्प सोडला आहे. प्रकल्पपूर्तीकरीता निधीची आवश्यकता आहे.मंडळाची हि वेब साईट परदेशात व भारतभर विखुरलेल्या भक्तजन व हितचिंतक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रभावी मध्यम आहे.
Read more