Navratra-2013
महालक्ष्मी तू महासरस्वती तूची महाकाली
जय जय कुलदेवते अंबे तूची माझी माऊलि!
श्री महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती अशा त्रिगुण स्वरूपी आदिशक्तीचे शरद ऋतूतील अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून मनोभावे केले जाणारे पुजन,सुख-दुःखाच अर्चन आणि क्षमा शांतीसह समर्पण म्हणजे आपला शारदीय नवरात्र उत्सव!
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो|| प्रतीपदेपासून घटस्थापना ती करुनी हो||
मूलमंत्र जप करुनी भोंवते रक्षक ठेवुनी हो|| ब्रम्ह विष्णु रुद्र आईचे पुजन करिती हो||
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो|| उदोकारे गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो||
प्रतिवर्षीप्रमाणे मंडळातर्फे ताम्हिणी येथे अश्विन शुद्ध प्रतिपदा, शनिवार दि.०५.१०.२०१३ रोजी श्रींचा शारदीय नवरात्र घटस्थापना दिवस साजरा होत आहे. सर्व देव्तावर षोडपचारे अभिषेक व पूजाविधी, विंझाई देवस्थान मंडळाचे प्रतिनिधी,उपस्थित भक्तजन व ताम्हिणी गावांतील व आसपासच्या ग्रामस्थांच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने घटस्थापना विधी संपन्न झाला.
मंडळाने या वर्षी श्री विंझाई मातेचे १० ग्रॅम चांदीचे नाणे वितरीत केले आहे. त्याची किमत रु. ५५०/- असून त्या साठी यांच्याकडे संपर्क करावा:-
१. कार्याध्यक्ष, श्री. विकास सबनीस.(डोंबिवली) – 0251 2886979 / 9702842233
२. कार्यवाह, श्री. अजित ताम्हणे (घाटकोपर ) – 9820647830
३. कार्यकारी मं. सभासद, श्री. सुधीर ताम्हणे ( पुणे ) – 020 25446049 / 9823591249