Ram Ganesh Gadakari

Ram Ganesh Gadkari

मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचे शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल, गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी येथे झाला.त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण जरी गुजरात मध्ये झाले असले तरी गडकऱ्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून ५ कि. मी. अंतरावर असलेले सांगवी आहे. पुणे येथून १९०४ मध्ये न्यू इंग्लिश मधून ते एस एस सी परीक्षा पास झाले. गोविंदाग्रज या टोपण नावाने १९०१ मध्ये नदीस आलेला पूर पाहून ह्या कवितेपासून गडकरी यांनी कविता लिहिण्यास सुरवात केली. वागवैजयंती ह्या प्रकाशित झालेल्या एकमेव काव्यसंग्रहात १३७ कविता आहेत. संपन्न शब्दभांडार,अफाट कल्पनाशक्ती, भावनांचे उत्कट प्रकटीकरण,विलक्षण अशी संवाद्शेली, शोकात्म, कारुण्य व्यक्त करण्याची प्रचंड ताकद हे त्यांच्या साहित्याचे विशेष. त्यांनी बाळकराम या नावाने अनेक विनोदी लेख लिहिले. १९०२ साली मित्रप्रीत हे नाटक लिहून नाट्य्शेत्रात प्रवेश केला. गर्व्निर्वान, प्रेम्सन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, ही नाटके लिहिली. २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे त्यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली!

About author

Sudhir Tamhane This article is written by Sudhir Tamhane