Sahastrakumkumarchan Sohala - 2013
या वर्षी दादर येथे दि. १८ ऑगस्ट १३ रोजी ब्राम्हण सेवा मंडळाच्या हॉल मध्ये
सहस्त्रकुंकुमार्चन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात झाला.यात ४२ सुवासिनींनी
पुजन केले तर एकून १२५ जणांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रम सुनियोजित
आणि नेटकेपणाने झाला. श्रीमती प्रधान, दादर यांच्या घरून श्रींच्या मूर्तींचे आगमन हॉल मध्ये झाले.
देवीची पूजा ओटी भरणे,आरती,गणेशपूजन या नंतर मध्यंतरात सर्वाना अल्पोपहार देण्यात आला.
सुपूर्ण कुकुमार्चन कार्यक्रमानंतर विद्यार्थी कौतुक समारंभ आणि या साठी ज्यांनी देणगी दिल्या
त्या देण्गीदारांचाही सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास श्री सुधाकर वैद्य,
अध्यक्ष,अ.भा.चा.का. प्रभू मध्यवर्ती संस्था प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचे या
वेळी मार्गदर्शनहि लाभले.या कार्यक्रमाची हि काही क्षणचित्रे.